पुणे : खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची ऑनलाईन फसवणूक 

cybar crime.jpg
cybar crime.jpg

पुणे : खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधून तिच्या एटीएम कार्डविषयक गोपनीय माहिती विचारुन तिची पाच हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सेनापती बापट रस्ता परिसरामध्ये घडली. 

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टेक टॉवर येथे एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहेत. मंगळवारी सकाळी त्या त्यांच्या कार्यालयास चालल्या होत्या. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याने तरुणीचा विश्‍वास संपादन करुन त्यांच्या एटीएम कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर काही वेळातच तरुणीचे खाते असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेतून पाच हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेण्यात आली.

बँक खात्यातील पाच हजार रुपये काढल्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर तरुणीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com