
पुणे : ऑनलाइन गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ३५ गुंतवणूकदारांची तब्बल आठ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंकुर धोका (रा. मार्केट यार्ड) यांनी तक्रार दिली असून, मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला