न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरू करावे की नाही? वकिलांची ऑनलाइन चळवळ

सनिल गाडेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

न्यायालयाचे कामकाज ऑगस्टमध्ये नियमित सुरू व्हावे असे वाटते का? खबरदारीच्या उपाययोजना सहित नियमित कामकाज करण्याचा धोका पत्करण्यास तुम्ही तयार आहात का? सध्या सुरू असलेल्या मर्यादित कामकाजाबाबत तुम्ही समाधानी आहात का? मर्यादित कामातून पक्षकारांना न्याय मिळत आहे का? अशा प्रकारचे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले आहेत.

पुणे : गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ केवळ तात्काळ प्रकरणांसाठी सुरू असलेले न्यायालयाचे कामकाज प्रलंबित प्रकरणांचा विचार करता पूर्ण क्षमतेने सुरु करावे या मागणीसाठी वकिलांनी ऑनलाइन चळवळ सुरु केली आहे. न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरु करावी की नाही? याबाबत ऑनलाइन सर्वे घेण्यात येत आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'विधीज्ञ मंच' हा सर्वे घेत आहेत. पाच महिने होत आले न्यायालयातील बरेसचे कामकाज ठप्प आहे. कोरोनाचे संकट एवढ्यात जाईल असे वाटत नाही. त्यामुळे कामकाज बंद ठेवणे हा त्याच्यावर उपाय नाही. सुनावणी होत नसल्याने राज्यात वकील आत्महत्या करत आहेत. पण दुर्दैवाने ही बाब फारशी गंभीरपणे घेतली जात नाहीये. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तरी न्यायालये खबरदारीच्या उपाययोजनासहीत नियमितपणे पुर्णवेळ सुरू व्हावीत, अशी बहुतांश वकिलांची भावना आहे. त्यासाठी हा सर्वे घेण्यात येत आहे. सर्वेचे निष्कर्ष उच्च न्यायालय, विधी व न्यायमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे ऍड. अतुल पाटील यांनी दिली.

वागूयात! डोकं ठिकाणावर ठेवून

न्यायालयाचे कामकाज ऑगस्टमध्ये नियमित सुरू व्हावे असे वाटते का? खबरदारीच्या उपाययोजना सहित नियमित कामकाज करण्याचा धोका पत्करण्यास तुम्ही तयार आहात का? सध्या सुरू असलेल्या मर्यादित कामकाजाबाबत तुम्ही समाधानी आहात का? मर्यादित कामातून पक्षकारांना न्याय मिळत आहे का? अशा प्रकारचे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले आहेत. न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू व्हावेत की नाही? याबाबत वकिलांनी आपले मत नोंदवावे, असे आवाहन मंचाकडून करण्यात आले आहे.

सर्वेत मत नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An online movement of advocates on whether courts should start at full capacity