म्हाडाच्या सदनिका सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरवात

पुण्यातील पाच हजार सदनिकांसाठी सोडत
Online registration for online MHADA flat pune
Online registration for online MHADA flat punesakal

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे शहर व परिसरात पाच हजारांहून अधिक सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सदनिकांची विक्री ही सोडतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या सोडतीत सहभागी होण्यासाठीची या सदनिकांच्या सोडतीसाठीच्या आॅनलाइन नोंदणीला गुरुवारपासून (ता.९) सुरवात झाली आहे. या सोडतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ही आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी शुक्रवारी (ता.१०) सांगितले.

पुणे शहर व परिसरात म्हाडाच्या उपलब्ध असलेल्या एकूण सदनिकांपैकी म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील शिल्लक राहिलेल्या २७८, बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्के कोट्यातून उपलब्ध झालेल्या २ हजार ८४५ आणि म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील १ हजार ९४५ अशा सदनिकांचा समावेश असल्याचे माने यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या सदनिकांच्या सोडतीत सहभागी होण्यासाठीच्या आॅनलाइन नोंदणीचा शुभारंभ काल (गुरुवारी) दुपारी दोन वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com