प्रॉपर्टी कार्डवरही आता ऑनलाइन नोंद | Property Card | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Property Card
प्रॉपर्टी कार्डवरही आता ऑनलाइन नोंद

प्रॉपर्टी कार्डवरही आता ऑनलाइन नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन सातबारा उतारा आणि फेरफार उताऱ्यावर नोंद घेणाऱ्या ‘ई-फेरफार’ योजनेत आता प्रॉपर्टी कार्डचाही समावेश करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ही योजना आता पुढील आठवड्यापासून राज्यात लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ २१ दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफारची नोंद घेतली जाणार आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून ऑनलाइनच्या माध्यमातून यापूर्वीच ग्रामीण भागातील जमिनींचे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यावर खरेदीदाराची सातबारा उताऱ्यावर नोंद होण्यासाठी ई-फेरफार योजना सुरू करण्यात आली, परंतु राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे. अशा शहरांमधील मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्रॉपर्टी कार्डावर नोंद घेण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत. त्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होता. त्यासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्यातून गैरप्रकारांनाही चालना मिळत होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्डच्या मिळकतींच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन ई-फेरफार करण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सहा महसूल विभागांतील एका तालुक्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. ती आता संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद!

फक्त एक दिवसाची प्रक्रिया

प्रॉपर्टी कार्ड असलेल्या मिळकतीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर याची माहिती ऑनलाइनच्या माध्यमातून भूमी अभिलेख कार्यालयाला पाठविली जाणार आहे. त्यानंतर त्याची छाननी होऊन लगेचच टिपण्णी होणार आहे. त्यानंतर टिपण्णी मंजूर नोटीस तयार होणार आहे. ही नोटीस ज्यांचे मेल आयडी असेल त्यांना ई-मेलने आणि ज्यांचे पत्ते असतील त्यांना टपालाने पाठविण्यात येणार आहे. ही सर्व प्रकिया ऑनलाइन आणि एकाच दिवसात होणार आहे.

यातील पुढील टप्पा म्हणजे नोटिशीवर हरकत देण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. हरकत दाखल न झाल्यास प्रॉपर्टी कार्डवरील ई-फेरफार ऑनलाइन तयार होणार आहे. त्यानंतर नागरिकांना तो ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन पैसे भरून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या मिळणार आहे.

loading image
go to top