ऑनलाइन भाडेकरार संकेतस्थळ ‘आजारी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

ऑनलाइन भाडेकराराबाबत तांत्रिक त्रुटी दूर करण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. या संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. 
- ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

पुणे - ऑनलाइन भाडेकराराचे संकेतस्थळ २३ जानेवारीपासून तांत्रिक त्रुटींमुळे वारंवार बंद पडत आहे. काल (ता.३) सायंकाळपासून आज (मंगळवारी) दुसऱ्या दिवशीही संकेतस्थळ बंद होते. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आय- सरिता’ प्रणालीवर ‘यूआयडी’ आणि ‘ग्रास पेमेंट’ हे संकेतस्थळ जोडून भाडेकराराचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या या संकेतस्थळावरील ऑनलाईन भाडेकरार नोंदणीमुळे राज्याच्या महसुलात वाढ होत आहे. 

गतवर्षी मार्च २०१९ पर्यंत २६ हजार कोटी रुपयांचे विक्रमी महसुली उत्पन्न मिळाले होते. परंतु, सध्या ऑनलाईन भाडेकराराचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत आहे. उपनिबंधक कार्यालयामधील असुविधा आणि खराब आसनांमुळे येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.

पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

तसेच, ऑनलाईन पोलिस पडताळणीचा उल्लेखही दस्तात केला जात नाही. आधी चलन आणि नंतर ‘यूआयडी’ पडताळणी यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे ठसे न जुळल्यास परतावा मिळवताना नाकीनऊ येत आहे. संकेतस्थळाच्या दुरुस्तीच्या कामाच्या वेळी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येत नाही. याबाबत ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट’ने वेळोवेळी महसूल विभागाकडे निवेदने दिली. परंतु, त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. या संदर्भात असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.४) नोंदणी महानिरीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच, या प्रश्‍नावर महसूल मंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online rent agreement website close