ऑनलाइन सातबाराची यंत्रणा कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा उतारा देण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सततच्या सर्व्हर डाऊन झाल्यामुळे खीळ बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सर्व्हरच्या क्षमतेत वाढ होईपर्यंत या उपक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ काही दिवस नागरिकांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या एक मेपासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यास सुरवात झाली. पुणे जिल्ह्यात काही तालुक्‍यांमध्ये ऑनलाइन सातबाराचे काम अद्याप सुरू आहे. एक ऑगस्टपर्यंत सुमारे अडीच कोटी डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे उतारे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून संकेतस्थळाचा वापर वाढल्यामुळे सर्व्हरवर ताण येत आहे. त्यामुळे या सुविधेला काही दिवस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सातबारा उतारा मिळण्यासाठी नागरिकांना पुन्हा तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत.

डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा देण्यास सुरवात झाली आहे; परंतु एकाच वेळी संकेतस्थळावर हजारो नागरिक लॉग इन करीत आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊन होत आहे. ही सुविधा पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. 
- रामदास जगताप, समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

Web Title: online sat bara system colapse