ऑनलाइन शाळेत विद्यार्थ्यांची 'दांडी': गैरहजेरीत 'एवढ्या 'टक्क्यांनी वाढ

Online school absenteeism increased by 20 to 30 percent
Online school absenteeism increased by 20 to 30 percent

पुणे : एरवीप्रमाणे प्रत्यक्ष नव्हे पण, ऑनलाइनच्या माध्यमातून शाळा सुरू झाली. या ऑनलाइन शाळेतही नियमितपणे प्रार्थना, आदल्या दिवशी शिकविलेल्या अभ्यासाची उजळणी झाली आणि वर्गशिक्षकांनी हजेरी (ऑनलाइन) घ्यायला सुरवात केली. 

लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

(संबंधित) विद्यार्थी: यस सर
वर्गशिक्षक : कुणाल...
विद्यार्थी: ....
वर्गशिक्षक : रोहन...
विद्यार्थी : ...
वर्गशिक्षक : संकेत...
विद्यार्थी : ...

जूनमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झाले, त्यावेळी  मोठ्या जल्लोषात 'यस सर' म्हणणारे  विद्यार्थी आता मात्र 'दांडी' मारू लागलेत. ६० विद्यार्थी संख्या असणाऱ्या एका वर्गातील जवळपास ४०-५० विद्यार्थी वर्गातील तासाला नियमित (किमान ऑनलाइन दिसतात) हजर असतात. मात्र त्यातील देखील १५ ते २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वर्ग सुरू झाला, म्हणून केवळ लॉगिन करून प्रत्यक्षात मात्र तासाला दांडी मारत असल्याचे निरीक्षण अनेक शिक्षक नोंदविले आहे. ऑनलाइन वर्गात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जवळपास २० ते ३० टक्के विद्यार्थी दांडी मारत असल्याचे वास्तव आहे. 

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

राज्य सरकारच्या आदेशानुसार १५ जूनपासून शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. त्यासाठी गूगल क्लासरूमसह विविध अॅप वापरले जात आहे. खरतर राज्यातील अनेक शाळांसाठी 'ऑनलाइन शिक्षण' हे नवीन होते. त्यामुळे शिक्षकांना या पद्धतीने प्रत्यक्ष शिक्षण देण्याची सवय व्हायला काही दिवसांचा अवधी लागला. मात्र ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये सुरवातीला कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के नोंदविली जात होती. मात्र आता विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. 

खराडी येथील  सुंदरबाई मराठे विद्यालयाचे ( माध्यमिक विभाग) मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले,"इयत्ता पाचवी ते दहावी मिळून शाळेत जवळपास बाराशे विद्यार्थी संख्या असून त्यातील केवळ आठशे, साडे आठशे विद्यार्थी दररोज ऑनलाइन वर्गात हजेरी लावतात. उर्वरित विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दुरावत आहेत. अर्थात या विद्यार्थ्यांचा शिक्षकांमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र इंटरनेट, मोबाईल याच्या अभावी मुलांना हजर राहणे शक्य नसल्याचे पालक सांगत आहेत. त्याशिवाय अनेकवेळा विद्यार्थी ऑनलाइन लॉगिन करतात; मात्र ऑनलाइन वर्गात प्रत्यक्ष हजर नसल्याचे दिसून येते."  खासगी इंग्लिश माध्यमाच्या ऑनलाइन शाळेत विद्यार्थ्यांचे दांडी मारण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे निदर्शनास आल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. 


"शाळेतील आणि सध्या कोरोनामुळे  परराज्यात असलेले १० ते १५ टक्के विद्यार्थी हे तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन शाळेत उपस्थित राहु शकत नाहीत, हे वास्तव आहे. ऑनलाइन येणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासाचे व्हिडीओ, नोट्स, असाइनमेंट व्हाट्सएपद्वारे पाठविल्या जात आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नयेत, म्हणून पालकांशी संपर्क साधला जात आहे."
- हेमा बर्डे, मुख्याध्यापिका, पीईएस मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल, वारजे

ऑनलाइन शाळेला यामुळे "दांडी"
- अभ्यासक्रमातील शिकविलेले समजत नसल्याने विद्यार्थ्यांचा रस झाला कमी 
- प्रत्यक्ष शाळा, वर्ग याची सवय असल्याने ऑनलाइन वर्गात शिकताना करावी लागतीय कसरत
- एका घरात एकच स्मार्टफोन आणि मग दोन-तीन भावंडे ऐकावेळी ऑनलाइन हजेरी लावणार कशी? पालक विचारतायत प्रश्न
- विद्यार्थ्यांमधील ऑनलाइन शिक्षणाची उत्सुकता झाली कमी
- कोरोनामुळे बाहेरगावी गेले विद्यार्थी 'नॉट रिचेबल'
- इंटरनेट, मोबाईल आणि सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com