जेईई, नीट परीक्षांचा अभ्यास होतोय 'व्हर्च्युअल' : विद्यार्थ्यी 'असा' करतायेत 'ऑनलाईन स्टडी'

online study of students who are preparing for JEE-NEET exams
online study of students who are preparing for JEE-NEET exams

पुणे : जेईई, नीट परीक्षेचा एरवी चार भिंतीत होणारा अभ्यास आता 'व्हर्च्युअल' होत आहे. या परीक्षांची तयारी करून घेणारे खासगी क्‍लासेसवाले आता ऑनलाईन वर्ग भरवित आहेत. एवढंच नव्हे, तर ऑनलाईन कोचिंगबरोबरच अन्य लाईव्ह लेक्‍चर्स, ऑनलाईन मॉक टेस्ट, विविध विषयांवर इंटरनेटवर उपलब्ध होणारे व्हिडिओ यामुळे अभ्यास करणाच्या कक्षाही विस्तारल्या आहेत.त्यामुळे इंटरनेटवर जेईई- नीट अभ्यासाचे शैक्षणिक साहित्य अधिकाधिक 'सर्च' होत असल्याची सद्यस्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षांचे कालावधी निश्‍चित झाल्याने आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनविले आहे. अर्थात, यामध्ये जवळपास तीन ते चार तास खासगी कोचिंग क्‍लासेसचा ऑनलाईन वर्ग सुरू असतो. त्यानंतर हे विद्यार्थी इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या लाईव्ह लेक्‍चरर्स, व्हिडिओ, मॉक टेस्टचा संदर्भ आणि सराव म्हणून वापर करत आहेत. या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकृत संकेतस्थळावर अभ्यासमाला, व्हिडिओ, मॉक टेस्ट विनामुल्य उपलब्ध आहेत. त्याशिवाय अन्य विविध संस्थांनी जेईई-नीट परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क शैक्षणिक साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे. त्याचा वापर करून सध्या विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत.

ओझोनच्या वापरातून कोरोना विषाणू नष्ट केला जाऊ शकतो? शास्त्रज्ञ म्हणतात...

'ऑनलाईन' हे शोधले तर होईल फायदा :
- आयआयटीच्या प्राध्यापकांचा "यु-ट्युब'वर ऑनलाईन अभ्यास वर्ग
- अभ्यासाच्या उजळणीसाठी (नामवंत संस्थांच्या) "मॉक टेस्ट'
- काही नामवंत कोचिंग संस्थांच्या व्हिडिओ अभ्यासमाला विनामुल्य खुल्या
- परीक्षेच्या तयारीसाठी निशुल्क समुपदेशन
- अभ्यासाचे साहित्य


काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी​

"ऑनलाईन' शिकविताना येणाऱ्या अडचणी :
- शिकविणे, सराव परीक्षा घेणे, साहित्य उपलब्ध करणे, शंकांचे निरसन करणे यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध नसणे
- कोचिंग सेंटरमधील 45 ते 50 वर्षे वयोगटातील प्रशिक्षक टेक्‍नोसॅव्ही नसणे. परिणामी तंत्रज्ञानाच्या वापरावर मर्यादा
- इंटरनेट जोडणीत येणारे अडथळा


पुणेकर दारूसाठी अपाॅइंटमेंट घेण्यातही आघाडीवर

"राज्यातील काही मोजक्‍याच कोचिंग केंद्रांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध होती. परिणामी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी क्‍लास चालकांनी झुम, वेबिनार, गुगल क्‍लासरूम, यु-ट्युब लाइव्ह यांसारखे पर्याय वापरण्यास सुरवात केली आहे. शिकविणे, गृहपाठ देणे, शंकांचे निरसन करणे, सराव परीक्षा घेणे आणि अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून देणे यासाठी वेगवेगळे पर्याय वापरले जात आहेत. तर विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून अन्य संदर्भ साहित्य वापरत आहेत. ऑनलाईन शिकविणे हे वर्गात शिकविण्या इतके प्रभावी ठरते की नाही, हे काळच ठरवेल.''
- दुर्गेश मंगेशकर, व्यवस्थापकीय संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

बारामतीतील त्या सतरा जणांची कोरोना टेस्ट

"ऑनलाईन कोचिंगचा फायदा होत आहे. घर बसल्या शिकायला मिळत असून बराच वेळही वाचतो. अर्थात, प्रत्यक्ष वर्गात शिकवण्यात आणि ऑनलाईन शिकण्यात बराच फरक आहे. मात्र, ऑनलाईन वर्गाचा वेगळा आनंद आहे. परीक्षेच्या तयारीसाठी स्वतंत्र ऍपवर किंवा संकेतस्थळावरील सराव चाचण्या उपयुक्त ठरत आहेत.''
- ईशा ढमढेरे, परीक्षार्थी

पुण्यात अडकलेत कामगार...यूपी, बिहार, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना कोण समजवणार? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com