ऑनलाइन कर भरण्याला प्राधान्य

Online Tax
Online Tax

पुणे - एकीकडे मिळकतकर थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन बॅंड वाजविण्याची वेळ महापालिकेपुढे येत असताना, दुसरीकडे शिस्तबद्ध पुणेकरांचा ऑनलाइन मिळकतकर भरण्याकडे कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत साडेपाच लाख नागरिकांनी तब्बल ६९९ कोटी ८१ लाख ६५ हजार ६९० रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यापैकी तीन लाख दोन हजार ४५८ जणांनी ऑनलाइन कर भरला आहे. दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३३ कोटी ८१ लाख रुपये जास्त मिळकतकर जमा झाला आहे.

मिळकतकर हे पुणे महापालिकेचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरावा, यासाठी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर भरणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत १० टक्के, तर त्यापुढे ५ टक्के सवलत देण्यात येते. या काळात शहरातील सर्व मिळकतकर भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही कार्यरत असतात, अनेक बॅंकांमध्येही मिळतकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 

२०१९-२० मध्ये महापालिकेने नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील १ लाख ४३ हजार  मिळकतींसह एकूण १० लाख ३३ हजार ६७१ मिळकतींमधून १८१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ६९९.८१ कोटी रुपये दोन महिन्यांत जमा झाले आहेत. उर्वरित ११०० कोटींचे उद्दिष्ट १० महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान मिळकतकर विभागासमोर आहे. यंदा दोन मिळकतींसह एकूण १० लाख ३३ हजार ६७१ मिळकतींमधून १८१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ६९९.८१ कोटी रुपये दोन महिन्यांत जमा झाले आहेत. उर्वरित ११०० कोटींचे उद्दिष्ट १० महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान मिळकतकर विभागासमोर आहे. यंदा दोन महिन्यांत ५ लाख ५२ हजार ८३२ मिळकतधारकांनी ६९९ कोटी ८१ लाख ६५ हजार ६९० रुपये जमा केले आहेत. त्यापैकी ३१९ कोटी ५७ लाख ७८ हजार ४५४ कोटी रुपये ऑनलाइन जमा करण्यात आले आहेत. ३ लाख २ हजार ४५८ जणांनी ऑनलाइन कर भरण्यास प्राधान्य दिले आहे, अशी माहिती महापालिकेचे 
सहायक आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com