‘पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन करावी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पदवीधरांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या कमी असल्यामुळे नोंदणी ऑनलाइन करण्यास परवानगी द्यावी. ऑनलाइन नोंदणी सुविधा सुरू झाल्यास मतदानाचा टक्काही वाढेल, असेही खेडेकर यांनी सांगितले.

पुणे - ‘पदवीधर मतदारांची संख्या वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन करावी आणि नोंदणीसाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द करव्यात,’ अशी मागणी ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे संस्थापक डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी केली.

 मतदार नोंदणी मोहिमस पुणे पदवीधर मतदारसंघात पदवीधरांच्या संख्येच्या तुलनेत कमी नोंदणी झाली. ‘‘पदवीधरांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या कमी असल्यामुळे नोंदणी ऑनलाइन करण्यास परवानगी द्यावी. ऑनलाइन नोंदणी सुविधा सुरू झाल्यास मतदानाचा टक्काही वाढेल,’’ असेही खेडेकर यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online voter registration