cycle track
sakal
पुणे
Cycle Track : पुण्यात ११ टक्केच सायकल ट्रॅक वापरण्यायोग्य; उर्वरित ट्रॅक नावालाच
सायकलींचे शहर अशी खास ओळख असणाऱ्या पुण्यात सायकलींसाठी आवश्यक जाळे तयार करण्यात महापालिका प्रशासन अपयशी.
पुणे - सायकलींचे शहर अशी खास ओळख असणाऱ्या पुण्यात सायकलींसाठी आवश्यक जाळे तयार करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. एकीकडे महापालिका सायकल स्पर्धेसाठी रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत आहे, तर दुसरीकडे महापालिकेनेच व्यापक सायकल योजनेअंतर्गत तयार केलेले सायकल ट्रॅकचे जाळे अवघे ११ टक्केच सुस्थितीत आहे. ‘परिसर’ संस्थेने केलेल्या ऑडिट अहवालातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
