अकरावी अॅडमिशन : पहिल्या यादीतील १५ हजार विद्यार्थ्यांचा 'नो रिस्पॉन्स'; तर 'इतक्या' विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश!

Students_Admission
Students_Admission

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीतील गुणवत्ता यादीत ४० हजार १३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, मात्र गेल्या चार दिवसांत त्यातील केवळ ५६.११ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयातील एक लाख सहा हजार ७७५ जागांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पहिली नियमित गुणवत्ता यादी रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात ४० हजार १३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या यादीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार ते गुरुवारपर्यंतची मुदत दिली होती. अर्थात आता या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत (ता.४) मुदतवाढ दिली आहे.

परंतु प्रवेशाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे तीन हजार ९४० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. तर जवळपास १३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया (प्रोसिड फॉर एडमिशन) सुरू केले. या प्रक्रियेतील प्रत्यक्ष प्रवेशाला सुरवात चार दिवस झाले, तरी केवळ २२ हजार ४५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर सुमारे २५ हजार नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संमती दर्शविला आहे. मात्र अद्याप १५ हजार चार विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीत नाव लागूनही प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याची माहिती इयत्ता अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या नियमित गुणवत्ता यादीतील प्रवेशाचा आढावा:
- पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ४०,०१३
- प्रवेशासाठी एकूण संमती दर्शविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : २५,००९
- आतापर्यंत प्रत्यक्ष झालेले प्रवेश : २२,४५३
- प्रवेश नकारलेले विद्यार्थी : ३१
- प्रवेश रदद् केलेले विद्यार्थी : १०१
- प्रवेशाला संमती दर्शविला पण अद्याप प्रवेश न घेतलेले विद्यार्थी : २४२४
- प्रवेशासाठी अद्याप कोणताही प्रतिसाद न दिलेले विद्यार्थी : १५,००४

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com