फेरपरीक्षेत ६० टक्केच उपस्थिती; शेवटच्या दिवशीही विद्यार्थ्यांच्या तक्रारी

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 7 November 2020

परीक्षेत साधारणपणे ६० टक्के उपस्थिती होती, ४० टक्के विद्यार्थी अनुपस्थितीत का राहिले हे स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे. 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या फेर परीक्षेला केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शनिवारी (ता.७) शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना काही प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

राजर्षी शाहू स्कॉलरशिपचे वाटप थकले; विद्यार्थी आर्थिक संकटात​

पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरू केल्या होत्या. यात पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थी परीक्षा देणार होते. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळे आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने फेरपरीक्षा घेण्याचे निश्चित केले. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाने गुगल फॉर्म भरून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सुमारे ३४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरून दिले. त्यांची परीक्षा ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार होती, त्यांना विद्यापीठाने एसएमएस आणि ई-मेल पाठवले होते.

Positive Story: बचत गटांतील महिलांनी खरेदी केल्या ४३ बस; संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली दखल​

परंतु पहिल्या दिवशीपासूनच विद्यार्थ्यांची संख्या परीक्षेला कमी होती. ५ नोव्हेंबरला १० हजार पैकी ५ हजार जणांनी परीक्षा दिली. ६ नोव्हेंबरला १२ हजार पैकी ७ हजार जणांनी, तर शेवटच्या दिवशी कला, विज्ञान व वाणिज्य या तीन शाखांचे सुमारे ३४ हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते. संध्याकाळपर्यंत त्यापैकी केवळ १० हजार जणांनी लाॅगइन केले. परीक्षेत साधारणपणे ६० टक्के उपस्थिती होती, ४० टक्के विद्यार्थी अनुपस्थितीत का राहिले हे स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे. 

दरम्यान, शेवटच्या दिवशी परीक्षेत लाॅगइन न होणे, विषय बदलणे अशा अडचणी आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. मात्र, परीक्षा व्यवस्थित पार पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 60 per cent students have appeared for final year re exam conducted by Savitribai Phule Pune University