पुणे : हॉस्पिटलमध्ये उरले कोरोनाचे साडेसात हजार रुग्ण; कोरोनामुक्त पोचले तीन लाखांजवळ!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवारी (ता.22) रात्री 9 वाजल्यापासून शुक्रवारी (ता.23) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे : पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून आता केवळ साडेसात हजार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत हा आकडा खूपच नगण्य आहे. सप्टेंबरच्या मध्यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा 35 हजारांवर गेला होता. शुक्रवारअखेरपर्यंत जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा तीन लाखांच्या जवळ पोचला आहे. शुक्रवारी (ता.23) पुणे जिल्ह्यात 721 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 321 जण आहेत.

खरेदीदारांनो, दसऱ्याला दस्त नोंदणी सुरूच राहणार; नोंदणी महानिरीक्षकांच्या सूचना​

गेल्या 24 तासांत एकूण 6 हजार 729 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शुक्रवारी 1 हजार 287 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 39 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 168, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 164, नगरपालिका क्षेत्रात 55 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 13 नवे रुग्ण
सापडले आहेत.

दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 20 जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील 3, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 9 आणि नगरपालिका क्षेत्रातील पाच आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवारी (ता.22) रात्री 9 वाजल्यापासून शुक्रवारी (ता.23) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणेकरांनो, सोनं लुटण्यासाठी छत्री घेऊन बाहेर पडा; दसऱ्याला वरुणराजा बरसणार!​

यामुळे पुणे जिल्ह्यातील शुक्रवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या
आता 3 लाख 18 हजार 329 झाली आहे. यापैकी 2 लाख 95 हजार 357 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख 47 हजार 642 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 82 हजार 715, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 46 हजार 534, नगरपालिका क्षेत्रातील 12 हजार 976 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 5 हजार 490 जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत 7 हजार 639 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 324 जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only seven and half thousand corona patients are treated in various hospitals in Pune city