पुणे : मोशीमध्ये लवकरच सुरु होणार ‘ओपन एक्‍झिबिशन’ केंद्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

असे आहे ओपन एक्‍झिबिशन सेंटर 

  • ३० हेक्‍टर जागेमध्ये उभारणार
  • १६ हेक्‍टर जागेत दोन प्रशस्त केंद्र
  • ४.५४ हेक्‍टरमध्ये स्वतंत्र पार्किंग 
  • अंतर्गत रस्ते पेव्हर ब्लॉकचे
  • आतापर्यंत ८० टक्‍के काम पूर्ण 
  • उर्वरित काम मार्चअखेर पूर्ण होणार 
  • तीन लाख लोकांना सामावून घेण्याची क्षमता
  • मुख्य प्रवेशद्वार हे मोटोराइज्ड टेलिस्कोपिक स्लायडिंग प्रकारातील
  • ७७ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार असून, २७ ठिकाणी स्वच्छतागृहे असतील.

पिंपरी - मोशीमध्ये उभारल्या जाणाऱ्या पुणे इंटरनॅशनल एक्‍झिबिशन ॲण्ड कन्वेन्शन सेंटरमधील ओपन एक्‍झिबिशन केंद्राचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ३० हेक्‍टर परिसरात विकसित करण्यात आलेली ही जागा केवळ औद्योगिक प्रदर्शनांसाठीच वापरण्याचा विचार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ओपन एक्‍झिबिशन सेंटरमध्ये वाहन क्षेत्राबरोबरच कृषी, अभियांत्रिकी आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या देश, विदेशांतील कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करता येईल. चाकण, तळेगाव आदी परिसरांत वाहन क्षेत्रातील कंपन्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

पिंपरी-चिंचवड शहरात पहा कोठे मिळणार शिवभोजन

आतापर्यंत २२ कोटी खर्च 
या कामासाठी आतापर्यंत २२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हा खर्च वसूल करण्यासाठी ही जागा औद्योगिक प्रदर्शनांसाठी चालवण्यासाठी देण्याचा विचार सुरू आहे. दरवर्षी होणाऱ्या प्रदर्शनातून प्राधिकरणाला केवळ एक कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open Exhibition Center in Moshi