पुणे - पिरंगुट येथे सृजन क्रिकेट करंडकचे उद्घाटन 

धोंडिबा कुंभार
शनिवार, 12 मे 2018

पिरंगुट (पुणे) : " ग्रामीण भागातील गुणवान आणि क्षमता असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत संधी मिळावी, या मुख्य हेतूने सृजन क्रिकेट करंडकाचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमुळे मुळशीतील कुस्ती खेळाबरोबरच क्रिकेट खेळालाही चालना मिळेल आणि त्यातूनच होतकरू खेळाडू नावारुपाला येतील. " अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी व्यक्त केली.

चांदे (ता.मुळशी) येथील सृजन क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कामठे बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आत्माराम कलाटे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सदस्य शांताराम इंगवले, बाबा कंधारे,  सुनील चांदेरे, कोमल साखरे, कोमल वाशिवले, पांडुरंग ओझरकर, विजय केदारी, अमित कंधारे, दगडुकाका करंजावणे, किरण राऊत, प्रमोद लोहोकरे, सारीका मांडेकर, नंदुशेठ भोईर, सचिन घोटकुले आदी उपस्थित होते.

स्पर्धेत बावीस संघांनी सहभाग घेतला असून विजेत्यास 51 हजार तर उपविजेत्यास 25 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रास्ताविक मधुर दाभाडे यांनी केले. यावेळी रोहित पवार, शंकर मांडेकर यांची भाषणे झाली. अर्जुन पुरस्कारप्राप्त शांताराम जाधव व राज्य कबड्डी संघाचा कर्णधार रिशांक देवाडीया यांचीही उपस्थिती लक्षवेधक होती. 

यावेळी शंकर मांडेकर म्हणाले, "मागचा अनुभव पाहता यावेळी लोकसभेसाठी तालुक्यातून मोठे योगदान द्यावे लागणार आहे. युवकांची उपस्थिती पाहता मी आजच आमदार झाल्यासारखे आहे. इथल्या प्रत्येक युवकाची इच्छा आहे , की शंकर मांडेकर आमदार व्हावेत. " या वाक्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.

Web Title: opening of srijan cricket cup in pirangut pune