ऑपरेशन ऑल आऊटमध्ये चोरट्यांना अटक 

संदीप घिसे 
शनिवार, 14 जुलै 2018

पिंपरी : शुक्रवारी सायंकाळपासून पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधासाठी अचानक 'ऑपरेशन ऑल आऊट' हे अभियान राबविले. यामध्ये मोटार चालकाला हत्यारांचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन चोरट्यांना जागीच अटक केली. ही घटना फुगेवाडी येथे घडली. यामुळे ऑपरेशन ऑल आऊट हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

अमोल रामचंद्र गायकवाड (वय 32, रा. मोरया पार्क, सूर्या लेन, पिंपळे गुरव), योगेश उल्हास गायकवाड (वय 28), रोहित अशोक गायकवाड (वय 22, दोघेही दोघेही रा. गायकवाड चाळ, फुगेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिरोज रमझान अत्तार (वय 22, रा. संघर्ष हौसिंग सोसायटी, आंबेडकर वसाहत, निगडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास फिर्यादी फिरोज हे खेड शिवापूर येथून दर्शन घेऊन मोटारीतून आपल्या घरी चालले होते. ते फुगेवाडी जकात नाका येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या मोटारीला दुचाकी आडवी घातली. चाकूचा धाक दाखवून फिरोज आणि त्यांचा मित्र यश कदम यांच्याजवळील चार हजार 350 रुपयांचे पाकीट व इतर मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. 

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी त्वरित तीनही चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल व घातक शस्त्र हस्तगत केले. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.

Web Title: In the operation all-out, the thieves were arrested