Operation Sindoor Mumbai High Courtesakal
पुणे
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त पोस्ट! पुण्यातील 'त्या' विद्यार्थीनीला हायकोर्टाचा दिलासा; सरकारचे काढले वाभाडे
Operation Sindoor Mumbai High Court: विद्यार्थ्यांनी आता आपली मतंही व्यक्त करायची नाहीत का? असा सवालही कोर्टानं सरकारला केला आहे.
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'वर वादग्रस्त इन्टापोस्ट करणाऱ्या पुण्यातील सिंहगड अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थीनीवर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली होती. तसंच तिला कॉलेजमधून काढून टाकताना परीक्षेचे उरलेले पेपर देण्यासही मज्जाव केला होता. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं महाराष्ट्र सरकारचे वाभाडे काढले तसंच कॉलेज प्रशासनाला देखील जाब विचारला आहे. विद्यार्थ्यांनी आता आपली मतंही व्यक्त करायची नाहीत का? असा सवालही कोर्टानं केला आहे.