PMC Recruitment : पुणे महापालिकेतील रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी

महापालिकेकडून प्रतिक्षायादी लावली जात नसल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला
Opportunity for waiting list candidates for vacancies in Pune Municipal Corporation
Opportunity for waiting list candidates for vacancies in Pune Municipal Corporationsakal

पुणे : पुणे महापालिकेतील पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकाची भरती झाल्यानंतर त्यातील काही जागा रिक्त आहेत. पण महापालिकेकडून प्रतिक्षायादी लावली जात नसल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

यावर अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्पष्टीकरण देत प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत असे सांगितले. त्यामुळे सुमारे ३८ जणांना दिलासा मिळणार आहे.

पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ पदांची भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५, लिपिक २०० आणि १०० जागा या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या होत्या.

आॅनलाइन परिक्षा झाल्यानंतर त्यामध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आले. त्यातून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून या उमेदवारांना महापालिकेच्या नोकरीत घेण्यात आले. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आले.

भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांची भरती पूर्ण झाल्यानंतर कही उमेदवारांनी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र दिले असल्याचा आरोप करण्यात आला. त्याची प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. तसेच काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Opportunity for waiting list candidates for vacancies in Pune Municipal Corporation
Pune Crime : जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे खुन प्रकरणातील आरोपीला वाघोलीत अटक

त्यानंतर काही उमेदवारांनी वैयक्तीक कारणाने नोकरीचा राजीनामा दिला. प्रशासनाने नेमलेल्या चौकशी प्रकरणात तिघांनी बनावट कागदपत्र दाखल केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ‘सकाळ’ने या प्रकरणात पाठपुरावा केला होता.

दरम्यान, कनिष्ठ अभियंत्याच्या १३५ पैकी १३ जागा रिक्त असताना तेथे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नोकरीत संधी देणे आवश्‍यक आहे. पण गेल्या तीन चार महिन्यापासून याचा पाठपुरावा करूनही अद्याप त्याबाबत काही निर्णय झाला नाही.

Opportunity for waiting list candidates for vacancies in Pune Municipal Corporation
Pune : मंडईमध्ये मधुशाला'महानगरपालिकेच्या दवाखान्याशेजारी सुरु असलेल्या या प्रकाराला कोणाचा आशीर्वाद

त्यामुळे हे उमेदवार हवालदिल झाले होते. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या ९७ पैकी ९० जागा भरल्या आहेत, त्यामुळे प्रतिक्षा यादीतील सात जणांना आणि लिपिक पदाच्या २०० पैकी १८१ जागा भरल्या आहेत.

या पदाच्या प्रतिक्षायादीतील १९ जणांना अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे या उमेदवारांकडून पाठपुरावा सुरू होता. आज अखेर महापालिका आयुक्तांनी प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार असे सांगितल्याने या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Opportunity for waiting list candidates for vacancies in Pune Municipal Corporation
Pune : बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावा ; जिल्हाधिकारी

प्रतिक्षा यादी रद्द झाल्याची चर्चा

महापालिका प्रशासनाने प्रतिक्षा यादी रद्द करून या जागा पुढील भरती प्रक्रियेत समाविष्ट केल्या असल्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू होती. त्यास अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला होता. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण आयुक्तांनी असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

‘‘कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या रिक्त जागा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन भरल्या जातील. याची प्रक्रिया लवकरच सुरू करू.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com