‘संडे सायन्स स्कूल’मध्ये सहभागाची रविवारपासून संधी

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजावण्यासाठी ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने २०११ पासून पुण्यामध्ये दर रविवारी वर्ग भरविले जातात.
Child Scientist
Child ScientistSakal
Summary

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजावण्यासाठी ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने २०११ पासून पुण्यामध्ये दर रविवारी वर्ग भरविले जातात.

पुणे - शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजावण्यासाठी ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने २०११ पासून पुण्यामध्ये दर रविवारी वर्ग भरविले जातात.

शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम देशभरात सुरू आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांच्या वतीने हा उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी येथे रविवारपासून (ता. १०) सुरू होत आहे.

काय आहे संडे सायन्स स्कूल?

दर रविवारी दोन तासांमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारे प्रयोग किंवा सायन्स मॉडेल सर्व विद्यार्थी स्वत: हाताने स्वतंत्रपणे बनवतात आणि तयार केलेले साहित्य घरी घेऊन जातात. ज्यातून आपोआप त्यांची छोटी प्रयोगशाळा घरी तयार होते. शिकलेल्या संकल्पना विद्यार्थी इतरांना समजावून सांगतात, यातून त्यांची स्वत:ची समज तर वाढतेच व सादरीकरण कौशल्य वाढीस लागते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान २१ ते २५ रविवारी एकत्र जमून स्वहस्ते प्रयोग करत विज्ञान शिकणार आहेत. ज्यांना प्रत्यक्ष सेंटरवर येणे जमणार नाही, त्यांच्यासाठी प्रयोगसंच कुरिअरच्या मदतीने घरपोच मिळणार आहेत. शिवाय, त्यांच्यासाठी व्हिडिओ व ऑनलाइन पद्धतीने घरातूनच पालकांच्या मदतीने मुले हे प्रयोग करतील. सर्व विषय इंग्रजीमधून व गरज वाटल्यास मराठीतून शिकवले जातील.

येत्या रविवारपासून संडे सायन्स स्कूलचे वर्ग पी. जोग हायस्कूल कोथरूड, विद्या विकास विद्यालय सहकारनगर-सातारा रस्ता, सकाळ कार्यालय बुधवार पेठ, सिंहगड रस्ता, वाकड, चिंचवड, खराडी व निगडी येथे सुरू होत आहे. प्रत्येक बॅचमध्ये ४० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ याप्रमाणे प्रवेश निश्चित करता येतील.

उपक्रम कालावधी (जुलै २२ ते जानेवारी २३)

सर्व प्रयोग साहित्य खर्चासह फी (रु.)

  • पहिली ते दुसरी - ४६००/-

  • तिसरी ते चौथी - ५४००/-

  • पाचवी ते सहावी - ६२००/-

  • सातवी ते नववी - ७२००/-

  • फी दोन हप्त्यांत भरण्याची सोय

अधिक माहितीसाठी फोन अथवा व्हॉट्सअॅप संपर्क - ९६०७२०८५५२/९३७३०३५३६९/८७७९६७८७०९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com