रुग्णालयांचा धनादेश स्वीकारण्यासही नकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

रुग्णांसह नातेवाइकांचे हाल; "डिस्चार्ज'साठी विलंब
पुणे - 'रुग्णालयातील पूर्ण पैसे भरा; मगच घरी सोडण्यात येईल,' अशी भूमिका काही रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. हा सर्व संवाद अत्यंत आपुलकीच्या भाषेत केला जातो; पण काही केल्या धनादेशाने पैसे स्वीकारले जात नसल्याचा धक्कादायक अनुभव रुग्णालयांमधून येत आहे.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाला घरी जाण्याचे वेध लागले होते. रुग्ण खडखडीत बरा झाल्याने आईच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नव्हता. पण, रुग्णालयातून घरी सोडण्याची सकाळी सुरू झालेली प्रक्रिया दुपारनंतरही पूर्ण होत नव्हती. तीन ते चार तासांची ही प्रक्रिया पाच-सहा तास झाले तरीही सुरू होती. धनादेशाद्वारे बिलाची रक्कम स्वीकारली जात नसल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांची धांदल उडाली होती. जुन्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बदलून सुट्टे करून घेणे, त्यासाठी बॅंकेच्या रांगेत उभे राहणे यात बराच वेळ गेला. त्यानंतरच सायंकाळी पैसे भरून रुग्णाला घरी सोडण्यात आले.

धनादेश स्वीकारावा, अशी विनवणी करूनही रुग्णालय प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याची रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रतिक्रिया दिली. रुग्णालय प्रशासन म्हणाले, 'धनादेश वटल्याशिवाय रुग्णाला घरी जाता येणार नाही. त्यासाठी कोणतेही अतिरिक्‍त बिल आकारले जाणार नाही.'' हा संवाद अत्यंत शांतपणे आणि समजावून सांगण्याच्या सुरात केला जातो. रुग्ण किंवा नातेवाईक दुखावला जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते.''

या बाबत संबंधित रुग्णालयाच्या विश्‍वस्तांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'रुग्णाला किंवा नातेवाइकांना बिल भरण्याचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. पण, धनादेशाद्वारे बिल भरणार असतील, तर तो वटण्याच्या जबाबदारीचे लेखी पत्र घेण्यात येत आहे.'

Web Title: oppose to demand draft by hospital