आळंदी देवस्थानला झटका; त्यांच्या 'या' निर्णयावर आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

  • समाधीवरील महापूजा बंदीला आक्षेप
  • आळंदी देवस्थानच्या निर्णयाला विरोध
  • भाविक, पुजाऱ्यांचे जिल्हा न्यायाधीशांना निवेदन

आळंदी : आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवरील महापूजा बंद करून चांदीच्या चलपादुकावर पूजा करण्याच्या निर्णयाला साडेचारशेहून अधिक भाविक, पुजाऱ्यांनी लेखी आक्षेप घेतला आहे. त्यांनी जिल्हा न्यायाधीश आणि विधी व न्यायमंत्र्यांकडे याबाबत निवेदन दिले. याबाबत पुढील निर्णय काय होणार, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहाटेच्या पवमान अभिषेकानंतर सकाळी अकरापर्यंत चालणाऱ्या महापूजा अनेक वर्षे सुरू असल्याने समाधीची झीज होत होती. ती बंद व्हावी आणि दर्शनाच्या रांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानच्या विश्वस्त समितीने पूजेबाबत पाहणी केली. मंदिरातील सीसीटीव्ही तपासले. याबाबत धर्मादाय आयुक्तांनीही यापूर्वीच देवस्थानला महापूजेत होणाऱ्या गैरसोयींबाबत आणि गर्दीचे नियोजन करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यास कळविले होते.

अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

पुरातत्त्व विभागाने पाहणी करून समाधीच्या होत असलेल्या झीजेबाबत स्पष्ट अहवालही दिला होता. याबाबत देवस्थानच्या पुजारी, मानकरी आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख घटकांबरोबरच अन्य देवस्थानमध्ये कशा पद्धतीने पूजा केल्या जातात, याचीही चर्चा व माहिती घेऊन देवस्थानने समाधीचे आणि परंपरांचे हित जोपासण्यासाठी निर्णय घेतला होता. पूजांच्या संख्यांचा अतिरेक आणि समाधीचे पावित्र्य राखणे याचा संबंध आल्यामुळे हा निर्णय घेण्याचा विचार केला, अशी बाजू देवस्थानकडून मांडण्यात आली होती. त्यानंतर 27 डिसेंबरपासून समाधीऐवजी चलपादुकांवर पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला विरोध असेल, त्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी सूचना करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदत देवस्थानकडून दिली होती.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

चलपादुकांवरील पूजेने श्रद्धेस तडा...
आळंदी देवस्थानच्या निर्णयास पुजाऱ्यांनी सुरुवातीला असहमती दर्शवली. मात्र, दुसऱ्याच दिवशी चलपादुकांवर पूजा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, समाधीवरील पूजेमुळे आत्मिक समाधान मिळते. चलपादुकांवर पूजा केल्याने श्रद्धेस तडा जातो. यामुळे समाधीवर अभिषेक पुन्हा सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to Alandi Devasthans decision to ban mahapuja on Samadhi

टॅग्स