esakal | तीन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणात जनता भरडली जातेय : देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

तीन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणात जनता भरडली जातेय : देवेंद्र फडणवीस

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. 

तीन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणात जनता भरडली जातेय : देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

पुणे : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली.  फडणवीस म्हणाले, ''या तीन पक्षांच्या कुरखोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे.'' यावेळी त्यांनी पदवीधरसाठी पुण्यातून आमचाच उमेदवार विजयी होईल असेही सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच पुणे पदवीधरमधून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची मते मिळतील. कोरोना काळात तर राज्य सरकारची निष्क्रीयताच दिसून आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. वीज बिलांबाबत देखील हे सरकार दिशाभूल करत आहे. हे सरकार केवळ आम्ही सुरू केलेल्या कामांना स्थगिती देत आहे.''

ह्रदय हेलावून टाकणारी घटना; खेळताना विहीरीत पडून 3 वर्षाच्या अधिराजने गमावला जीव

 ठाकरे सरकार विरोधकांशी संवाद साधत नाही. कोरोना काळात भ्रष्टाचार होत असेल तर विरोधक गप्प राहणार नाहीत. खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की भाजपच्या 100 नेत्यांची नावे आम्ही ईडीला देऊ शकतो, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ''खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याकडील नावांची यादी पुढे आणावीच.'' मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, अनेक प्रश्नांबाबत तसेच मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार वेळकाढूपणा करीत आहे. तीन पक्षांच्या राजकारणात जनता भरडली जाते आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच बाजी मारणार यात काहीही शंकाच नाही. या सरकारला आता वर्ष पूर्ण होईल पण महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने एकही काम या सरकारने केलेलं नाही. तीन पक्षांमध्ये मुळीच समन्वय नाही त्यामुळे या तीन पक्षांच्या राजकारणात महाराष्ट्राची जनता भरडली जाते आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रामीण भागात मी गेलो होतो, पश्चिम महाराष्ट्रात जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही ठिकाणी तर पंचनामेही झालेले नाहीत. तीन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जाते आहे. 

ठाकरे सरकारबद्दल जो रोष आहे तो या निवडणुकीत मतदार दाखवतील आणि या निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळेल असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image
go to top