महिलेवर अत्याचार; मांत्रिकास अटक

Crime
Crime

पुणे - पतीचा आजार बरा करतो, असे सांगून घरी आलेल्या मांत्रिकाने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ शुटिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. याप्रकरणी या मांत्रिकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली.

अनिकेत संजय फराटे (वय 29, रा. खराडी), असे त्या मांत्रिकाचे नाव आहे. यासंदर्भात 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. फराटे याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला गंभीर आजार झाल्याचे समजल्यावर फराटे याने फिर्यादी यांची ओळख काढून सरकारी अधिकारी आहे, अशी बतावणी केली. तुमच्या पतीचा आजार जादूटोण्याने बरा करतो, असे सांगितले. फराटे याने फिर्यादींच्या घरी येणे जाणे सुरू केले. एकदिवस त्याने फिर्यादी व त्यांच्या पतीला औषधी लस्सी पिण्यास दिली. त्यानंतर ते दोघे बेशुद्ध पडले. फराटे याने महिलेवर आत्याचार करून त्याचे व्हिडिओ शुटिंग केले. फिर्यादी शुद्धीवर आल्यावर याबाबत कोणाला काही सांगितल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने फिर्यादी व त्यांच्या भावाकडून पैसे उकळले.

फिर्यादी यांच्या पतीचे ऑक्‍टोबर 2018 मध्ये निधन झाल्यानंतरही फराटे हा त्यांना ब्लॅकमेल करत होता. त्याच्या त्रासाला वैतागून त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून फराटेला अटक करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com