Vidhansabha 2019 : विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची तोंडी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाने घेतल्या. यात चिंचवडचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी तोंडी परीक्षा अर्थात मुलाखत दिली. शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरीतून सर्वाधिक सात जण इच्छुक आहेत. 

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाने घेतल्या. यात चिंचवडचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी तोंडी परीक्षा अर्थात मुलाखत दिली. शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरीतून सर्वाधिक सात जण इच्छुक आहेत. 

भाजपचे पक्षनिरीक्षक व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या मोरवाडी कार्यालयात मुलाखती घेतल्या. खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, बाबू नायर आदी उपस्थित होते. 

विधानसभानिहाय इच्छुक 
पिंपरी : माजी नगरसेवक राजेश पिल्ले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक शैलेश मोरे, खासदार साबळे यांची कन्या वेणू साबळे, तेजस्विनी कदम, माजी नगरसेवक भीमा बोबडे, दीपक रोकडे. 
चिंचवड : आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक संदीप वाघेरे. 
भोसरी : आमदार महेश लांडगे, रवींद्र लांडगे, प्रमोद निसळ. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oral examination of MLAs for Assembly elections