Pune Rain News : शासनाच्या सर्व विभागांना गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश – दिलीप वळसे पाटील

गारपिटीने आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील सर्वच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
order to all departments of govt to report crop damage caused by hail rain dilip walse patil
order to all departments of govt to report crop damage caused by hail rain dilip walse patilSakal

पारगाव : गारपिटीने आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील सर्वच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतला आहे शासनाच्या सर्व विभागांना त्वरित पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले असून तातडीने पंचनामे हि सुरु झाले आहे अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाई साठी राज्य मंत्रीमंडळात पाठपुरावा करणार असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील वाळुंजनगर, रानमळा, खडकवाडी वडगावपीर, मांदळेवाडी धामणी, लोणी या परिसरात काल सायंकाळी गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या सर्व गावांचा दौरा केला शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेतले त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णु हिंगे पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, भगवान वाघ, भगवान सिनलकर यांच्यासह शासनाच्या वतीने आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे,

तहासिलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, महावितरणचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर आदी शासकीय अधिकारी होते. पावसाबरोबरच मोठ्या आकाराच्या गारा पडल्या त्यामुळे पिकांची पाने गळून पडली आहेत.

काढणीला आलेली बटाट्याची पिके तसेच शेतात काढणी सुरु असताना सरीतील बटाटे व काकडी गारांच्या माऱ्याने फुटले, लागवडीसाठी तयार असलेले कांद्याची रोपे नष्ट झाली आहे. जनावरांचा हिरवा चारा भुईसपाट झाला आहे तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे व जिल्हाधिकारी पुणे यांना अहवाल सादर करण्याचे आदेश श्री. वळसे पाटील यांनी दिले.

लोणीचे माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी मागणी केली कि शेतातील सर्वच पिकांचे नुकसान नुकसान झाले असल्याने सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे अशी मागणी केली तर वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना म्हणाले अगोदर या भागात पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती त्यातच गारपीट झाल्याने शेतात असलेला थोडाफार हिरवा चाराही भुईसपाट झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे जनावरांच्या चाऱ्यासाठी या भागात शासनाने चारा छावणी सुरु करावी अशी मागणी केली.

रानमळ्याचे सरपंच राजु सिनलकर, महेंद्र वाळुंज, बाबु आदक, अशोक आदक पाटील, उदय डोके, बाळशिराम वाळुंज, सतीश थोरात, चंद्रकांत गायकवाड, गुरुदेव पोखरकर, वामन जाधव, अशोक वाळुंज यांनी प्रातिनिधिक स्वरुपात पिकांच्या नुकसानीची माहिती श्री. वळसे पाटील यांना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com