पुण्यातील हि संस्था देते ज्येष्ठांना आधार, मुलांना प्रेम

भिलारेवाडी (कात्रज) - जनसेवा फाउंडेशनच्या अनाथ पुनर्वसन केंद्रात शिक्षण घेणारी मुले.
भिलारेवाडी (कात्रज) - जनसेवा फाउंडेशनच्या अनाथ पुनर्वसन केंद्रात शिक्षण घेणारी मुले.

पुणे - समाजातील सर्व मतभेदांना दूर करून मानवतावाद जपणारी पुण्यातील जनसेवा फाउंडेशन ही संस्था अनेक वर्षांपासून काम करत आहे. संस्थेच्या माध्यमांतून २०० ज्येष्ठांचे संगोपन केले जात आहे. तसेच अनाथ पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून पंधरा वर्षांखालील ऐंशी मुला-मुलींच्या उदरनिर्वाहाची आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जनसेवा संस्थेने पानशेत धरणाजवळ आंबी, रानवडी येथे वृद्धाश्रम आणि सेवा केंद्र यांची उभारणी केली असून त्यामध्ये सुमारे २० ० ज्येष्ठांचे संगोपन केले जात आहे. यातील निम्म्याहून अधिक ज्येष्ठांना मोफत सेवा दिली जात आहे. तसेच या ठिकाणी वॉर्डबॉय व आया ट्रेनिंगही दिले जाते. याशिवाय येथे ग्रामीण हॉस्पिटल सुरू असून दरवर्षी सुमारे हजार ते बाराशे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.  

फाउंडेशनच्या वतीने कात्रज भिलारेवाडी येथे पंधरा वर्षाखालील सत्तर ते ऐंशी मुलामुलींच्या उदरनिर्वाहाची आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. फाउंडेशनमार्फत संगणक, शिलाईकाम आणि वाहनचालक या प्रकारचे प्रशिक्षण या भागातील स्त्रिया, मुली, अपंग व ग्रामीण तरुणांना मोफत दिले जात आहे. या उपक्रमांव्यतिरिक्त गेल्या आठ वर्षांपासून रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करून त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कार्य जनसेवा फाउंडेशनतर्फे केले जात आहे. 

वेल्हा तालुक्यातील शंभर गावांमध्ये आरोग्य सेवा, दोन हजार घरांमध्ये शौचालय बांधकाम, नऊ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आरओ प्लांटचे बांधकाम, रूरल हॉस्पिटलच्या माध्यमातून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, डिलिव्हरी, तर कोविडच्या काळात सहा हजार मंडळींना रोजचे जेवण, तीन हजार घरांतून रेशन किट, मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप व वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.
- राजेश शहा, खजिनदार, जनसेवा फाउंडेशन

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com