अनाथांना मायेची ऊब देण्यात सर्वोच्च आनंद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

...अन्‌ अश्रू अनावर
काही दिवसांपूर्वी ‘आधार’मध्ये चार दिवसांची चिमुकली दाखल झाली होती. मात्र तिची प्रकृती खूपच चिंताजनक होती. सतत तिच्यावर उपचार सुरू होते. सर्वजण दिवसरात्र चिमुकलीची चिंता करीत होते. तिच्या उपचारासाठी समाजातून मदतीचे हातही धावून आले. सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला नवा जन्म मिळाला. हा हृदयद्रावक प्रसंग कथन करताना संस्थेच्या संस्थापिका माधवी भिडे यांना अश्रू अनावर झाले.

पिंपरी - 'आईच्या उदरातूनच जन्माला आलेलं बाळ म्हणजे खऱ्या मातृत्वाचा आनंद. असं समर्पक होणार नाही. खरंतर डोक्‍यावरचं छत्र हरपलेल्यांना मायेची ऊब आणि हक्काचा निवारा देणं यात जगातील सर्वोच्च आनंद आहे. त्यासाठी समाजाप्रती सहानुभूती असायला हवी. वेदना समजायला हवी,’ असे मत अनाथ चिमुकल्यांना दत्तक घेतलेल्या अनेकांनी बालक-पालक मेळाव्यात व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निगडी प्राधिकरणातील ‘आधार’ अनाथ आश्रमात बालक-पालक मेळावा रविवारी (ता. १९) झाला. या वेळी अनाथांना ओळख करून दिलेले पालक कोलकता, अमरनाथ, विरार, कोकण, मुंबई, औरंगाबाद, पुणे व पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातून आले होते. सर्व पालक एकमेकांना विचारपूस करीत होते. ‘आधार’मध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

बारामती : रंजन तावरे यांच्यावर गुन्ह्या दाखल झाल्याने तणाव

हसतखेळत उत्साही वातावरणात चिमुकली दंग झाली होती. वय वर्ष अठरा पूर्ण झालेल्या चिमुकल्यांनी आजोळी आल्याच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका माधवी भिडे व रामचंद्र भिडे उपस्थित होते. ‘लहान मुलं संभाळणं सर्वांत जबाबदारीचं काम आहे. आधार ते काम सहजरीत्या पेलत आहे. मी अशा माणसांमध्येच देव शोधतो,’ असे मत डॉ. अभिजित सोनावणे यांनी व्यक्त केले.

दत्तक घेऊ इच्छिणारे म्हणतात... 
खूप दिवसांपासून बाळ दत्तक घेण्याचे मनात काहूर माजले होते. विविध प्रश्‍न समोर उभा राहत. मात्र, आता कुटुंबीयांसह सर्वांना आमच्या निर्णयाचा अभिमान वाटतो. समाजातील वाईट मनोवृत्ती असलेल्यांकडे दुर्लक्ष करून आता आमची मुलंही सुंदर आयुष्य जगतील. सर्वांत चांगलं करिअर देऊन मुलांना आयुष्यात घडवायचं आहे, अशा भावना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी व्यक्त केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orphans balak palak campaign in aadhar center