बारामती : रंजन तावरे यांच्यावर गुन्ह्या दाखल झाल्याने तणाव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्यावर गुन्ह्या दाखल झाल्याप्रकरणी माळेगाव, पणदरे भागामध्ये परस्परविरोधी गटा मध्ये तणावाचे वातावरण आहे या पार्श्वभूमी विचारात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्यावर गुन्ह्या दाखल झाल्याप्रकरणी माळेगाव, पणदरे भागामध्ये परस्परविरोधी गटा मध्ये तणावाचे वातावरण आहे या पार्श्वभूमी विचारात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस निरीक्षक भाऊसाहेब घोलप यांच्या यांच्या अधिपत्याखाली परिस्थिती नियंत्रणात आहे. तत्पूर्वी काल (ता.१९) माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे प्रमुख रंजन तावरे यांनी पतसंस्थेतेचे सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्या संगनमताने ५१ लाख ३० हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. 

धक्कादायक! वाईड बॉल टाकला म्हणून गोलंदाजाची डोक्यात बॅट घालून मैदानावरच हत्या

त्या प्रकरणी माळेगाव कारखान्याचे संचालक व पतसंस्थेचे सभासद सुरेश तुकाराम खलाटे (रा.कांबळेश्वर) यांनी तावरे व खैरे यांच्याविरुद्ध शनिवार (ता. १८) रोजी उशिरा पोलिसात फिर्याद दिली. सन २०११ साली पतसंस्थेचे अध्यक्ष तावरे व सचिव खैरे यांनी संगनमत करून माझ्यासह रामदास आटोळे (खांडज), राजेंद्र सखाराम बुरूंगले (माळेगाव बुद्रूक) आम्हा तिघांच्या कोऱ्या कर्जमागणी प्रकरण, धनादेशावर सह्या घेतल्या व आमच्या नावे प्रत्येकी १७ लाख १० हजार रुपये असे एकूण ५१ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखविले. तसेच सदर रक्कम बेरर चेकद्वारे आमच्या परस्पर काढून घेतली, अशी तक्रार खलाटे यांनी फिर्यादीत नमूद केली आहे.

पाकिस्ताच्या 2800 जणांना भारतीय नागरिकत्व; केंद्र सरकारची माहिती

उपलब्ध फिर्याद व सहाय्यक निबंधकांच्या चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी शरद संस्थेचे अध्यक्ष तावरे व सचिव  खैरेंच्या विरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, रक्कमेचा अपहार करणे, विश्वासघात करणे, तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.

शिवसेनेबाबत पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले...

दरम्यान, या प्रकरणातील फिर्य़ादी खलाटे, आटोळे, बुरुंगले व संशयीत आरोपी तावरे हे एकमेकांचे २० वर्षांपासूनचे खंद्दे समर्थक होते. परंतु मार्च २०१९मध्ये शरद संस्थेतून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच खलाटे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tensions created in baramati due to criminal charges over Ranjan Taware