Daylight Leopard Attack Shocks Otur Village
Sakal
ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील रहाटी मळा येथे दिवसा ढवळ्या बिबट्याने हल्ला करून पायी चाललेल्या शेतकऱ्यांला जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजे दरम्यान रहाटीमळा येथे घडली असून यात विनोद बबन चौरे वय ५० हे जखमी झाले आहेत.बिबट्याने हल्ला करून त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला बिबट्याचे चार दात त्यांच्या मांडीला लागले आहे.