Godown Fire : ओतूर मध्ये गोडाऊनला आग, लाखोचे नुकसान

ओतूर, ता. जुन्नर येथील नगर कल्याण महामार्गावर मोनिका चौक लगत असलेल्या लिंबानी ट्रेडर्स या बिल्डिंग मेटरियल दुकानच्या गोडाऊनला सोमवारी दुपारी अचानक आग लागली.
Limbani Traders Fire
Limbani Traders Firesakal

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील नगर कल्याण महामार्गावर मोनिका चौक लगत असलेल्या लिंबानी ट्रेडर्स या बिल्डिंग मेटरियल दुकानच्या गोडाऊनला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत सुमारे पंचवीस ते तीस लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती लिंबानी ट्रेडर्स मालक शंकर पटेल (लिंबानी) यांनी दिली.

गोडाऊन शेजारील शेतात उसाचे पाचट जाळण्यात आले होते. याच्या झाळा लागून गोडाऊनला अचानक मोठी आग लागून गोडाऊन मधील पाण्याच्या टाक्या, प्लास्टिक व फायबर पाईप, पलंबिंग मटेरियल, बेसीन, प्लायवूड, टाईल्स, पॅकिंगचे गवत इत्यादी. माल जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने गोडाऊन मधील मजूर जेवायला बाहेर गेले असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सदर आग लागल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराने, महेश पठारे, दत्ता तळपाडे, सखाराम झुंबड, रोहित बोंबले यांच्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचून बघ्यांची झालेली गर्दी हटविण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामस्थासह प्रयत्न केले. तसेच जुन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास प्राचारण केले. अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणली.

सदर घटनेमुळे आगीचे व धुराचे प्रचंड लोळ उठल्याचे लांबून दिसत होते व संपूर्ण परिसर धुराने व्यापल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. सदर घटनेमुळे ओतूर शहरातील वीज पुरवठा काही काळ बंद करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com