esakal | कांदा चोरी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७ लाखाचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Otur_Police

सदर चोरीबाबत वरद विष्णू देसाई (रा.डिंगोरे, ता.जुन्नर) यांनी गुरुवारी (ता.२२) त्यांच्या कांदा चाळीतील कांद्याच्या भरलेल्या पिशव्या बराखीचे कुलूप तोडून चोरून नेल्याबाबत ओतूर पोलिसांत फिर्याद दिली होती.

कांदा चोरी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डिंगोरे (पुणे) : येथील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतील कांदे चोरून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीसह सात लाखांचा मुद्देमाल ओतूर पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

केतन सुधीर हांडे (वय.२१, रा.पिंपळगाव जोगा),अक्षय देवराम सदाकाळ (वय.२३, रा.मढ),सौरभ सुभाष मस्करे (वय.१९, रा.मढ), विक्रम सखाराम गोडे (वय.२१, रा.तळेरान, सध्या रा.पिंपरी-चिचवड) या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पिकअप एम.एच.१४ जी.यु.१२५३, स्प्लेंडर एम.एच.१४ ई.झेड ३७६७,पॅशन एम.एच.१४ सी.एच.११०२ आणि ४९ पिशवी कांदा असा एकूण सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फॅबीफ्लू लंपास प्रकरण: बेमुदत उपोषण आंदोलन अखेर मागे​

सदर चोरीबाबत वरद विष्णू देसाई (रा.डिंगोरे, ता.जुन्नर) यांनी गुरुवारी (ता.२२) त्यांच्या कांदा चाळीतील कांद्याच्या भरलेल्या पिशव्या बराखीचे कुलूप तोडून चोरून नेल्याबाबत ओतूर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार ओतूर पोलिसांनी जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलिस उपनिरीक्षक ए.के.शेळके, पोलिस कॉन्स्टेबल पंकज पारखे, नवनाथ कोकाटे यांच्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले. त्यात संशयित स्प्लेंडर गाडीवर दोन तरुण जात असताना दिसले. त्यानुसार सदर गाडी आणि तरुणांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे केतन हांडे आणि अक्षय सदाकाळ अशी सांगितली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी सदर कांद्याची चोरी केल्याचे कबूल केले.

शून्य अपघाताचे 'बारामती मॉडेल' विकसित होणार; अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी घेतला पुढाकार​

या चोरीत सौरभ मस्करे आणि विक्रम गोडेे हे ही त्याच्या बरोबर चोरीत सहभागी असल्याचे सांगितले. तसेच कांद्याच्या चाळीतून कांदे चोरताना पिकअप गाडी आणि दोन दुचाकींचा वापर केला असल्याचे कबूल केले. सदर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच कांदा पिशवी अंदाजे किंमत १ लाख ९८ हजार ५३४, पिकअप चार लाख, दोन दुचाकी एक लाख असा एकूण ६ लाख ९८ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींना ओतूर पोलिसांनी शुक्रवारी (ता.२३) जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)