शून्य अपघाताचे 'बारामती मॉडेल' विकसित होणार; अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी घेतला पुढाकार

Baramati_Police
Baramati_Police

बारामती (पुणे) : दरवर्षी उसाचा ट्रेलर, बैलगाडी किंवा ट्रकला धडकून होणारे अपघात शून्यावर आणण्यासाठी आता बारामतीत मॉडेल विकसित केले जाणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांच्या संयुक्त प्रयत्नातून अपघात होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. 

बारामतीत मिलिंद मोहिते यांनी बारामती तालुका, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण, वडगाव निंबाळकर, दौंड, यवत, शिरुर, शिक्रापूर, राजगड या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक शुक्रवारी (ता.२३) घेतली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे हेही या बैठकीला उपस्थित होते. 

पुरवठादार आणि कारखानादारांना एकत्र आणले...
या बैठकीत रिफ्लेक्टर्स, जॅकेट पुरवठादारांनाही बोलविण्यात आले होते. कारखान्यांना वेळेत या बाबी पुरविण्याची ग्वाही त्यांनी दिल्यानंतर कारखानदारांनाही याबाबत कार्यवाहीची ग्वाही दिली. 

शून्य अपघाताचे उद्दिष्ट...
दरवर्षी उसाच्या बैलगाडी, ट्रॅक्टर किंवा ट्रकला धडकून अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. हे अपघात टाळण्यासाठी आता मोहिम हाती घेण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनानेही यात सक्रिय मदतीची तयारी दाखवली असून भविष्यात शून्य अपघात होतील, असे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून काम सुरू केले आहे.

- मिलिंद मोहिते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती.

काय केले जाणार...
•    हेल्मेटविना दुचाकीवरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारखान्यात प्रवेशबंदी
•    वाहनाचालकांची अचानक ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी होणार. 
•    वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्यास जप्तीची कारवाई.
•    प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर्स लावण्याची सक्ती केली जाणार. 
•    वाहनाचालकांचे प्रबोधन केले जाणार.
•    आवश्यकता भासल्यास फलकांद्वारे जागृती होणार
•    पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग संयुक्त प्रयत्न करणार.
•    सहकारी आणि खाजगी साखर कारखाने प्रशासनाला मदत करणार.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com