पाणी टंचाईच्या गडद छायेतून यंदा पुणे जिल्हा बाहेर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

पुणे जिल्हा यंदा तीव्र पाणीटंचाईच्या गडद छायेतून पुर्णपणे बाहेर आला आहे. जिल्ह्यातील कायम दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजलेल्या जाणाऱ्या बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आणि खेड या पाच तालुक्यात अद्याप एकही टॅकर सुरू झालेला नाही. सध्या भर उन्हाळ्यात तेरापैकी अवघ्या दोन तालुक्यात केवळ दहा टॅकर सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी आजअखेर (ता. ४) तब्बल सव्वाशे  टॅकर सुरु करावे लागले होते.

पुणे - पुणे जिल्हा यंदा तीव्र पाणीटंचाईच्या गडद छायेतून पुर्णपणे बाहेर आला आहे. जिल्ह्यातील कायम दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजलेल्या जाणाऱ्या बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आणि खेड या पाच तालुक्यात अद्याप एकही टॅकर सुरू झालेला नाही. सध्या भर उन्हाळ्यात तेरापैकी अवघ्या दोन तालुक्यात केवळ दहा टॅकर सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी आजअखेर (ता. ४) तब्बल सव्वाशे  टॅकर सुरु करावे लागले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाय दरवर्षी टँकरची सुरुवात ही बारामती, इंदापूर, पुरंदरसह दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पाचपैकी एका तालुक्यातून होत असे. विशेष म्हणजे यंदा हे पाचही तालुके किमान आजपर्यंत तरी टँकरमुक्त आहेत. 

महत्त्वाची बातमी : लॉकडाउनमध्येही पुणेकरांना दररोज मिळणार वृत्तपत्र!

सध्या आंबेगाव आणि खेड या दोन तालुक्यात १० टँकर सुरु झाले आहेत. यापैकी आंबेगाव तालुक्यात नऊ तर, खेड तालुक्यात एक टँकर सुरु आहे. आंबेगाव तालुक्यातील आठ गावे आणि २३ वाड्या-वस्त्या आणि खेड तालुक्यातील एक गाव व १३ वाड्या अशा एकूण फक्त नऊ गावे ३६ वाड्या-वस्त्यांमधील १२ हजार ७१७ लोकसंख्येला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा. पुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Out of Pune district this year out of the dark shadow of water scarcity