शाळेबाहेरची शाळा आता पुण्यातही

पुणे - रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा गट
पुणे - रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा गट
Updated on

पुणे - कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून प्रथम संस्थेच्या पुढाकारातून शालेय शिक्षण विभागाच्या नागपूर आयुक्तालयाने ‘शाळेबाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील यशस्वी प्रयोगानंतर आता पुणे शहर आणि जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केल्याचे प्रथम संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या उपक्रमात जिल्हा परिषदेबरोबरच पुणे आकाशवाणीला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे उपक्रम प्रमुख मच्छिंद्र पडवळ यांनी सांगितले. शिरूर, वेल्हा, मावळ, मुळशी यांसारख्या ग्रामीण भागासह शहरातील शिवाजीनगर, गोखलेनगर, धनकवडी, येरवडा, रामनगर, माळवाडी आदी परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम सुरू झाल्याचे ‘प्रथम’च्या लता खरात यांनी सांगितले. प्रथम ॲप, गावचे सार्वजनिक सभागृह किंवा मंदिराचे भोंगे, गावातील सुशिक्षित तरुण यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.

उपक्रमाची उद्दिष्ट्ये 

  • कोरोनाच्या काळात मुलांच्या अभ्यासात खंड न पडू देणे 
  • तणावमुक्त वातावरणात मुलांना अभ्यास देणे
  • मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग निश्‍चित करणे

पालकांनो, तुम्ही हे करा... 

  • मोबाईलवर ‘प्ले स्टोअर’मधून Pratham Maharashtra हे ॲप डाऊनलोड करून पाल्याचा शालेय उपक्रम देऊ शकता
  • आधीचे भाग पाहण्यासाठी यु ट्यूबवर ‘प्रथम’च्या चॅनेलवर जाऊ शकता
  • उपक्रमाचा अहवाल पुणे जिल्हा परिषदेला सादर केला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास त्यात सहभागी होता येईल.

उपक्रमाचे स्वरूप

  • रेडिओ प्रसारण आठवड्यात तीस मिनिटांचा एक या प्रमाणे तीन भागांचे प्रसारण. यामध्ये मुलांनी घरी बसून शिकण्यासाठी काही कृतींचे सादरीकरण करण्यात येते. 
  • मोबाईलद्वारे संदेश शाळास्तरापासून विभागस्तरापर्यंतच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपचा वापर करता येऊ शकतो. यात पालकांनाही समाविष्ट करण्यात येत आहे.
  • अभ्यासाचे नियोजन मस्ती आणि अभ्यास या संकल्पनेतून मुलांसाठी खेळ, गप्पागोष्टी यावर आधारित अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्यात येईल.

या उपक्रमातून साचेबद्ध अभ्यासक्रमाची कृती न देता विद्यार्थ्यांना परिसरातून शिकविण्याचा प्रयत्न केला जातो. सद्यःस्थितीत ३० जिल्ह्यांत हा उपक्रम सुरू आहे. 
- सोमराज गीरडकर, राज्य प्रमुख, प्रथम संस्था

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com