

Travel Uncertainty for Kailash Pilgrims as China Visa Clearance Gets Delayed
sakal
पुणे : कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील ५२ भाविकांचा एक गट सध्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे अडकून पडला आहे. यात्रेसाठी लागणारे आवश्यक परवाने (परमिट) मिळूनही आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही, चीन सरकारने अद्याप त्यांना व्हिसा दिलेला नाही. त्यामुळे पुढचा प्रवास पूर्णपणे रखडला असून, हवालदिल झालेल्या या भाविकांनी आता थेट भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे तातडीने मदतीची याचना केली आहे. राज्यातून सुमारे २०० भाविक काठमांडूत अडकले आहेत.