Lockdown : 'भाडं द्या भाडं'; घरमालकांचा भाड्यासाठी विद्यार्थ्यांमागे तगादा!

Room-Rent
Room-Rent

स्वारगेट : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी घरी गेले, त्याच बरोबर काही विद्यार्थी पुण्यामध्येच अडकले असताना त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा सामना करावा लागत आहे. त्यात आणखी भर पडली आहे घरभाड्याची.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तीन महिने भाडे देण्यासाठी सूट द्यावी, असा आदेश काढला असताना अनेक घर मालक भाड्यासाठी फोन करून तगादा लावत आहेत. त्यामुळे पुण्यात राहणारा विद्यार्थी वर्ग अडचणीत आला आहे.

काही दिवसांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा येऊन ठेपल्या होत्या, पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन झाल्याने परीक्षाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आपापल्या घरी गेले. त्याचबरोबर काही विद्यार्थी पुण्यामध्येच अडकून राहिले. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामना करावा लागत आहे. येणाऱ्या काळात अनेक लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी रूम, खाजगी हॉस्टेल्स सोडलेली नाहीत.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अभ्यास करणारा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शेतकरी व रोजंदारीवर घर चालत असलेल्या वर्गातील असल्याने या वर्गाचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे आणखी स्थिती खराब झाली आहे. त्यामुळे या घरभाड्याचे पैसे कोठून भरायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यातच अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात आणखी भर पडली आहे.

अनेक विद्यार्थी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाउन झाल्याने घरी गेले आहेत, तर काही येथेच अडकून पडले आहेत. पुढील काही दिवसांत परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनी खाजगी हॉस्टेल आणि रुम सोडलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना घरमालक भाड्यासाठी तगादा लावत आहेत. तरी विद्यार्थ्यांना तीन महिन्याचा कालावधी द्यावा, असा निर्णय असतांना हा विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास होत आहे, तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी.
- सुनील राठोड, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com