इंदापुरात साकारतेय "ऑक्‍सिजन पार्क'

Oxygen
Oxygen

इंदापूर (पुणे) : इंदापूर नगर परिषदेच्या वतीने अटल आनंद वन योजनेअंतर्गत हरित इंदापूरसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी भार्गवराम बगीचाशेजारील टाउन हॉलच्या पाठीमागे वीस गुंठ्यांमध्ये 2150 वृक्ष लागवड करण्यात आली. नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टच्या शहा नर्सरीमधून यासाठी मोफत रोपे मिळाली. पर्यावरण संतुलनासाठी ऑक्‍सिजन पार्क निर्मिती हा या उपक्रमाचा हेतू आहे.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदापूर नगर परिषदेने देशात दहावा क्रमांक मिळवला असून, पुढील टप्प्यामध्ये हरित इंदापूरचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. उपक्रमात युवा क्रांती प्रतिष्ठान, शिवा ग्रुप, रोटरी क्‍लब, लायनेस क्‍लब, आरोग्य संदेश प्रतिष्ठान, श्री. नारायणदास रामदास हायस्कूल; कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, राधिका माध्यमिक विद्यालय, सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय, ज्येष्ठ नागरिक संघ, संत निरंकारी मंडळ, उजेरभाई शेख व भरतशेठ शहा मित्रपरिवार, व्यापारी संघटना सहभागी झाल्या आहेत. नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

पर्यावरणप्रेमी रघुनाथ ढोले, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, नगरसेवक जगदीश मोहिते, कैलास कदम, नगरसेविका राजश्री मखरे, सागर गानबोटे, गुड्डू मोमीन, अशोक मखरे, ललेंद्र शिंदे, शिवाजी अवचर, नंदकुमार गुजर, सायरा आत्तार, सुनीता कदम, सुप्रिया अगरखेड, जयश्री खबाले, रोटरीचे वसंत माळुंजकर, अध्यक्ष राकेश गानबोटे उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन पुंडे, तर आभार अल्ताफ पठाण यांनी मानले.

येथे छोटे जंगल विकसित करून प्रदूषण रोखण्याबरोबरच ऑक्‍सिजन भरपूर मिळावा म्हणून देशी झाडांची लागवड केली आहे. झाडे जगविण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.
- अंकिता शहा, नगराध्यक्षा, इंदापूर

शहराला स्वच्छतेत देशात अग्रक्रमांक मिळवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असून, पारदर्शी प्रशासनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.
- डॉ. प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com