ओझर: सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन   

दत्ता म्हसकर
बुधवार, 4 एप्रिल 2018

जुन्नर - राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे व धर्मादाय सह आयुक्त शिवाजीराव कचरे, पुणे विभाग यांनी गरीब शेतकरी कष्टकरी इत्यादीच्या मुला मुलीसाठी मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी, शेतमजूर कामगार वर्ग मुला मुलींच्या लग्नासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढून कर्जबाजारी होत आहे. हा खर्च व कर्ज देखील आत्महत्येचे कारण ठरत आहे. कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून मोफत सामुहिक विवाहामध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यानुसार सह धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे व श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, ओझर ता.जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ११ मे २०१८ रोजी श्री क्षेत्र ओझर तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. या ठिकाणी मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी इच्छुक वधू वरांच्या पालकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.  (०२१३२)२८८३३०, ९८२२३१९४९५, ९०७५११४४५५, (०२०)२६१६२७२८, २६१६२६१८, २६१६९८९३

Web Title: ozar - Appeal to participate in community marriage