निसर्गसौंदर्याने नटले ओझर्डे गाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

बेबडओहोळ - मावळ तालुक्‍यात पडणारा पाऊस, सह्याद्रीच्या डोंगर रांगा व त्यातून खळखळणारे धबधबे हे निसर्गप्रेमींसाठी नेहमीचे आकर्षण. सध्या पवन मावळात ओझर्डे गावाजवळील द्रुतगती महामार्गालगत असणाऱ्या डोंगरातून उंचावरून कोसळणारे धबधबे येथून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक व प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.

द्रुतगती महामार्गावर असणारे ओझर्डे गाव सध्या निसर्गाने भरभरून वरदान दिल्याप्रमाणे हिरव्यागार सौदर्यांने न्हाऊन निघाले आहे. गावाजवळील डोंगरावरील धबधबे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे. सोमाटणेपासून फक्त चार किलोमीटरवर असणाऱ्या या धबधब्यांकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. गावाच्या सुरवातीलाच तयार झालेले पाण्याचे झरे, ओढे एखाद्या पर्यटन क्षेत्रालाही मागे टाकणारे आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच सध्या ओझर्डे गाव पर्यटनक्षेत्र म्हणून नावारूपाला येऊ लागले आहे. हे पाहता या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास ग्रामस्थांना रोजगाराचे साधन निर्माण होईल, असे बोलले जात आहे.

Web Title: ozarde village Nature beauty