पुणे : चिदंबरम झाले ट्रोल, पण कशावरून वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

पुणे विमानतळावर पिण्याच्या पाण्याची बाटली ६० रुपयांना कशी विकली जाते, व्हेंडिंग मशिन बसविले तर तिची किंमत २५ रुपयांपर्यंत खाली आणता येईल, असे ट्विट करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना या विषयावरून नेटिझन्सनी शनिवारी ट्रोल केले.

पुणे - पुणे विमानतळावर पिण्याच्या पाण्याची बाटली ६० रुपयांना कशी विकली जाते, व्हेंडिंग मशिन बसविले तर तिची किंमत २५ रुपयांपर्यंत खाली आणता येईल, असे ट्विट करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना या विषयावरून नेटिझन्सनी शनिवारी ट्रोल केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिदंबरम एका कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी चार तासांसाठी पुण्यात आले होते. परतताना त्यांनी पिण्याच्या पाण्याची बाटली लोहगाव विमानतळावर ६० रुपयांना मिळते, असे ट्विट केले. तसेच, त्यासाठी व्हेंडिंग मशिन बसविण्याचाही सल्ला दिला. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना त्यांनी टॅग केले होते. त्यावर पुणे विमानतळाच्या हॅंडलवरून लगेचच रिप्लाय देण्यात आला. त्यात, ‘चिदंबरम यांची सूचना स्वागतर्ह आहे. व्हेंडिग मशिन लवकरच बसविण्यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्नशील आहे,’ असे सांगण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा ट्विट केले. त्यात ‘पुणे विमानतळावर पिण्याचे पाणी ग्लाससह मोफत उपलब्ध आहे. तसेच, पहिल्या मजल्यावर पिण्याच्या पाण्याची बाटली दहा रुपयांना, चहा २० रुपयांना आणि कॉफी २५ रुपयांना उपलब्ध आहे,’ असे निदर्शनास आणून देण्यात आले. या ट्विटचे नेटिझन्सने मोठ्या प्रमाणात स्वागत केले.

शिवजयंती तारखेनेच साजरी करण्याची मागणी

आयटी प्रोफेशनल पी. के. नायर म्हणाल्या, ‘‘पुणे विमानतळावरील सुविधेबाबत ट्‌विट केले, तर प्रशासन लगेचच त्याची दखल घेते, असा अनुभव मलाही यापूर्वी आला आहे. खरोखरच विमानतळ प्रशासन ॲक्‍टिव्ह आहे.’’ मात्र, विमानतळावरील सुविधांची पुरेशी माहिती न घेता चिदंबरम यांनी केलेल्या ट्‌विटबद्दल नेटिझन्सनी उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विमानतळावरील खाद्यपदार्थांचे दर जास्त आहेत, म्हणून अनेक प्रवाशांनी यानिमित्त नाराजीही व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: p chidambaram troll on water bottle