'पानी फाऊंडेशन'च्या कामामध्ये 'सैराट'मधील 'मंग्या'चे श्रमदान

प्रा. प्रशांत चवरे
मंगळवार, 1 मे 2018

भिगवण : गतवर्षी वाॅटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळविलेल्या तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावाने याही वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. परिसरातील सामाजिक संस्था, सेलेब्रिटी यांना पानी फाऊंडेशनच्या कामामध्ये सहभागी करुन घेण्यात येत आहे. सैराट फेम मंग्या उर्फ धनंजय ननवरे यांनी तक्रारवाडी गावास भेट देत येथे श्रमदान केले.

तक्रारवाडी (ता.इंदापुर) गावाने गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. चालू वर्षी गावातील तरुणांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला ग्रामपंचायत सदस्य विलास गडगर, बलभीम पिसाळ, अंकुश वाघ, शिवाजी थोरात,ऋषिकेश काळंगे, प्रवीण गडकर, चेतन वाघ, अभिनव वाघ, आदींनी पाणी फाऊंडेशनच्या कामाची धुरा सांभाळली आहे. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सैराट फेम मंग्या उर्फ धनंजय ननवरे यांनी तक्रारवाडी गावास भेट देत श्रमदान केले.

येथील सायकल क्लब व नेचर फाउंडेशनच्या सदस्यांनीही श्रमदानांमध्ये सहभाग घेतला. यावेळी सायकल क्लबच्या वतीने संजय चौधरी, संपत बंडगर, रियाज शेख, डॉ.जयप्रकाश खरड, अर्जुन तोड़कर, केशव भापकर, नितिन चितळकर व अकबर तांबोळी यांनी सायकलवर येवून येऊन श्रमदान केले. एल बी एस प्रकारातील एक दगडी बंधारा बांधला. पाणी फाऊंडेशनच्या कामामध्ये अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच शोभाताई वाघ यांनी केले आहे.

Web Title: Paani foundation work in Takrarwadi