esakal | 'आरे' दूध विक्रीबाबत महत्वाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

milk.jpg

कात्रज डेअरीच्या मदतीने "आरे' दूधाचे पॅकिंग, वितरण चालूच 
रमजान ईदनिमित्त 15 हजार लिटर्स इतकी विक्री 

'आरे' दूध विक्रीबाबत महत्वाची बातमी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी ः खडकी येथील शासकीय दूध योजनेच्या दुग्धशाळेमार्फत, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात कात्रज दूध डेअरीच्या सहकार्याने "आरे' दूधाचे पॅकिंग, वितरण चालूच ठेवले असून, यंदाच्यावर्षी रमजान ईदनिमित्त सुमारे 15 हजार लिटर्सहून अधिक "आरे' दूधाची विक्री झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या जोरदार वादळवाऱ्याने खडकी येथील शासकीय दूध योजनेच्या दुग्धशाळेचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे, तेव्हापासून, तेथील दूध स्वीकृती, पॅकिंग आणि वितरणाचे काम बंद आहे.

रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) च्या सहकार्याने, 20 ते 22 मे पर्यंत सुट्या दूधाऐवजी हवाबंद पिशव्यांमधून 36 रुपये प्रतिलिटर या दराने "आरे' दूधाचे पॅकिंग आणि वितरण करण्यात आले होते. त्याला लक्षणीय प्रतिसाद लाभला. "आरे' दूधाच्या वितरणात खंड पडू नये यादृष्टीने, शासकीय दूध योजनेच्या दुग्धशाळेमार्फत, त्याचे पॅकिंग आणि वितरण कात्रज डेअरीमार्फतच चालू ठेवण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दुग्धशाळा व्यवस्थापक डी. पी. बनसोडे म्हणाले, "गेल्या वर्षी रमजान ईदमध्ये आरे दूधाची जवळपास 20 हजार लिटर्स इतकी विक्री झाली होती. नैसर्गिक आपत्तीला तोंड देत शासकीय दूध योजनेने यंदाही दूध विक्री चालू ठेवली. मागील वर्षाची तुलना करता यावेळेस प्रतिसाद कमी लाभला. "आरे' दूधाच्या वितरणात खंड पडू नये म्हणून कात्रज डेअरीच्या सहकार्याने दूधाचे पॅकिंग आणि वितरण चालूच ठेवण्याचा निर्णय झाला असून त्यानुसार रोज जवळपास साडेपाच हजार लिटर्स आरे दूध वितरीत केले जात आहे.

पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार