आंदर मावळ भागात भात लावणीच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

सर्वच शेतकरी लावणीच्या कामात व्यस्त असल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही शेतकरीवर्ग पडकई किंवा ईरजिक पद्धतीने भात लावणी करीत आहेत. 

टाकवे बुद्रुक : आंदर मावळाच्या पश्चिम भागात भात लावणीच्या कामाला वेग वाढला आहे. मजूर टंचाई जाणवत असल्याने पडकई किंवा ईरजिक पद्धतीने भात लावणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी 
भात लावणीसाठी कर्जत तालुक्यातील मंजुरांना आणले आहे. 

पश्चिम भागातील वडेश्वर, शिंदेवाडी, घाटेवाडी, नागाथली, वाहनगाव, कुसवली, बोरीवली, कांब्रे, डाहुली, कुसूर, खांडी, निळशी, सावळा, माळेगाव बुद्रुक व खुर्द, कुणे, अनसुटे, मानकुली, पारीठेवाडी, इंगळूण,किवळे, कशाळ, भोयरे, कोडिवडे,टाकवे बुद्रुक, घोणशेत, कचरेवाडी, वाऊंड, साईत लावणीच्या कामाला वेग आला आहे. 

सर्वच शेतकरी लावणीच्या कामात व्यस्त असल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही शेतकरीवर्ग पडकई किंवा ईरजिक पद्धतीने भात लावणी करीत आहेत. नागाथलीतील मारूती खांडभोर, रामचंद्र खांडभोर म्हणाले, "14  एकर जमिनीत लावणी सुरू असून, मजुरांना तुटवडा जाणवतो. ठाकर समाजाचे मजूर आणले आहे. दोन वेळेचे जेवण, नाश्तासह तीनशे रूपये मजुरी द्यावी लागते. इंद्रायणी, कोळबा हे मुख्य भात पिक बियाणे घेतले असून, चारसूत्री लावणीवर जोर आहे.

Web Title: Paddy Farm work at Ander Maval area

टॅग्स