
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एन आय ए) पथक भेट देणार असून त्यांच्याकडून संपूर्ण घटनेबाबत माहिती घेतली जाणार आहे. दोन्ही कुटुंबियांचे जबाब नोंदविले जाणार आहेत.