

Pune News: 'ते' दोघेही एकाच परिसरात राहण्यास होते, शाळेतही एकत्र जायचे. कुटुंब असो किंवा व्यवसाय, कुठेही त्यांच्या मैत्रीची 'साथ' सुटली नाही. अगदी काल-परवा दोघेही आपल्या कुटुंबियांसमवेत पृथ्वीवरच्या नंदनवनात आनंद लुटण्यासाठी गेले. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. दोन्ही कुटुंब मोठ्या आनंदात चिंब होताना दहशतवाद्यांच्या पावलानं आलेल्या काळाने अक्षरशः कुटुंबासमोरच 'त्या' दोघांवर घाला घातला अन् काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. दोघेही कुटुंबापासून खूप खूप दूर गेले, बालपणी जुळलेली त्यांची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंतच टिकली असे नाही, तर त्यांनी 'ही दोस्ती तुटायची नाय' या शब्दांना प्रत्यक्षात उतरवीत अगदी अनंताच्या प्रवासातदेखील तीच 'साथ' एकमेकांना दिली !