तळेगाव ढमढेरे - जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील निसर्गरम्य परिसरात दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटक मरण पावले असून वीस पेक्षाही अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील काही पर्यटक तेथे अडकले होते..शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील सहा महिला पर्यटक तेथे अडकल्याने सर्व गायकवाड कुटुंब व ग्रामस्थ चिंतेत होते. मात्र कोंढापुरीतील सर्व सहा पर्यटक महिला सुरक्षित विमानाने मुंबईत व तेथून कोंढापुरी गावात सुरक्षित पोहोचल्याने गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे..कोंढापुरी येथील भास्कर गायकवाड यांच्या पत्नी मनीषा गायकवाड, बहिण तेजल गायकवाड, दिपाली गायकवाड, ललिता आदक, मामाच्या मुली दिपाली लोखंडे व रूपाली तांबे या सर्व महिला पर्यटक १५ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते.२५ एप्रिल रोजी हे पर्यटक पुन्हा घरी परतणार होते. मात्र दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पर्यटनासाठी गेलेले गायकवाड कुटुंब पूर्ण घाबरले होते. श्रीनगर हे कुटुंब सुरक्षित असल्याचे दूरध्वनीवरून भास्कर गायकवाड यांना सांगण्यात आले होते..दरम्यान, भास्कर गायकवाड यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी भाजपचे शिरूर तालुका अध्यक्ष जयेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता श्री शिंदे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून सदर पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी व मदतीविषयी माहिती दिली होती. दोघांनीही योग्य प्रतिसाद देऊन गुरुवारी सर्व पर्यटकांना मुंबई सुरक्षित आणण्यात आले..तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनीही पर्यटकांना फोन करून आधार दिला होता. तसेच कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून गावातील पर्यटक महिला काश्मीरमध्ये अडकल्याचे सांगितले होते.खासदार सुळे यांनीही पर्यटकांची चौकशी करून आधार दिला असल्याचे भास्कर गायकवाड यांनी सांगितले. मदतीबद्दल सरकारचे व सर्व नेत्यांचे भास्कर गायकवाड यांनी आभार मानले आहेत. आम्ही सर्व पर्यटक सुरक्षित घरी पोहोचलो असल्याचे महिलांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनी आमच्या सुरक्षिततेसाठी मदत केली त्या सर्वांचे महिलांनी आभार मानले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.