पाकिस्तानला हवी पुण्याकडून मदत

दिलीप कुऱ्हाडे 
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे - सिंधू संस्कृतीमधील आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो या जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले नाही तर त्याचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा काढून घेणार असल्याचे जागतिक पुरातत्त्व विभागाने पाकिस्तानला सांगितले आहे. त्यामुळे जागे झालेल्या पाकिस्तानने भारताकडे विशेषत: डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाकडे मदत मागितल्याची माहिती डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलकुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘मोहेंजोदडो सध्या पाकिस्तानमधील सिंध सरकारच्या अंतर्गत येते. नुकतेच सिंध सरकारने हडप्पा-मोहेंजोदडो या जागतिक वारसास्थळाच्या संवर्धनासाठी एक परिषद घेतली होती. त्यात अमेरिका व युरोपमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा सहभाग होता. भारत व पाकिस्तानचा सांस्कृतिक वारसा एकच आहे. बौद्धिक विचार करण्याची पद्धतसुद्धा समान असल्यामुळे सिंध सरकारने सिंधू संस्कृतीचा दोन्ही देशांनी मिळून अभ्यास करण्यासाठी साद घातली आहे.’’ पाकिस्तानने मोहेंजोदडोपेक्षा मोठ्या लखिनजोदडो या स्थळाचे उत्खनन केले. मात्र, सरकारची उदासीनता, पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा अभाव त्यामुळे त्या स्थळाचे संशोधन झाले नाही, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

हडप्पा व मोहेंजोदडोचे उत्खनन पुणेकरांकडून  
ब्रिटिशकाळात १९२०मध्ये हडप्पा- मोहेंजोदडोचे उत्खनन झाले होते. त्या वेळी सिंध प्रांत मुंबई इलाख्यात होता. तर पुरातत्त्व विभागाचे कार्यालय त्या वेळी पुण्यात होते. त्यामुळे मोहेंजोदडोचे उत्खनन  पुण्यातील लोकांनी केल्याची आठवण डॉ. वसंत शिंदे यांनी सांगितली.

 हडप्पा- मोहेंजोदडोचा वारसास्थळाचा दर्जा धोक्‍यात
 सिंधू संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी साद
 दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा एकच असल्याचे सांगत पाकिस्तानने उचलले पाऊल

हडप्पा-मोहंजोदडो येथे अमेरिका व युरोपमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी संशोधन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संवर्धन करताना युरोपियन हवामानाचा विचार केला. मात्र ही पद्धती सिंधमधील वातावरणाला अनुकूल नसल्यामुळे वारसास्थळावरील विटांचा भुगा झाला.स्थानिकांनी मातीमध्ये सुकलेले गवत,पालापाचोळ्याचा लेप देण्याची सूचना केली आहे. हे तंत्र वापरल्यास दहा वर्षे वारसास्थळाचे संवर्धन होईल. 
- डॉ. वसंत शिंदे,  कुलकुरू , डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ

Web Title: pakistan help by pune