पालखी येण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

राजकुमार थोरात
गुरुवार, 5 जुलै 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील तावशी ते बावडा रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले असुन संत सोपानदेव महाराज व संत संतराज महाराज यांचे पालखी सोहळे येण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थामधून हाेत आहे.

संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातुन लासुर्णे मार्गे कळंब,निमसाखर,निरवांगी,रेडणी मार्गे अकलूजला जातो.तसेच संतराज महाराज यांचा पालखी सोहळा ही तावशी,जांब कुरवली -चिखली मार्ग कळंब-निमसाखर,निरवांगी मार्गे पंढरपूरकडे जात असतो. इंदापूर तालुक्यातुन पालखी जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था झाली अाहे. तावशी ते बावड्यपर्यंत रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावरील खड्डे पालखी येण्यापूर्वी बुजविण्याची मागणी  इंदापूर तालुक्यातील नागरिकामधून होत आहे.

रस्त्यावरील राडरोडा हटविण्याची मागणी...
खासगी मोबाईल कंपनीने  ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी कळंब ते बावड्यापर्यंत ठिकठिकाणी बीकेबीएन रस्त्यालगत चर खोदली आहे.यामुळे सध्या रस्त्यावर राडरोडा झाला असून पालखी येण्यापूर्वी खोदलेल्या चर बुजवून राडरोडा हटविण्याची गरज आहे.

Web Title: before palakhi comes first refill potholes on road